المدة الزمنية 15:10

Veg.Thai soupव्हेज .थाई सूपrestaurant style

372 مشاهدة
0
7
تم نشره في 2019/11/09

Description नमस्कार स्वाद रसिकहो! 'Cook with Teja' या आपल्या चॅनेल मध्ये तुमचं खूप स्वागत आहे..!!! मी तेजा पारुंडेकर!!!.. Architect by profession and Cook by passion...!!! आपल्या घरच्यांना, आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना आणि आपल्याला स्वतःला पण वेगवेगळे पदार्थ करायला आणि खिलवायला आणि मुख्य म्हणजे खायला पण प्रचंड आवडतात ...हो की नाही?... अगदी आजी-आई चा हातचा एखाद्या पदार्थापासून ते लेटेस्ट म्हणजे कुणा मैत्रिणीकडे किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लेल्या डिश पर्यंत प्रत्येक गोष्ट घरी करून बघायला तुम्हाला आवडत असेल ! मलापण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी हेच प्रश्न पडत होते आणि त्याची उकल करत करत, एकेक गोष्ट शिकत शिकत मी आज इथपर्यंत आले ..!! माझा युएस मध्ये असलेला मुलगा आणि लग्न होऊन पुण्याला असलेली मुलगी यांना पण माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज हव्या होत्या. मग मी त्याकरिता व्हिडिओ बनवून यूट्यूब च्या माध्यमातून पाठवत होते... त्यातूनच हे चॅनेल तयार झाले... किचन मध्ये काम करत असताना आपल्याला छोटे-छोटे प्रश्न पडतात. समोरची एखादी डिश बघितल्यावर ,ही कशी केली केली ?असा प्रश्न पडतो. तर अशाच किचन मधल्या आपल्याला माहित असलेल्या आणि नसलेल्या खूप काही गोष्टी तुम्हाला माझ्या या चॅनेलवर मिळतील.... स्वयंपाक करताना तुम्हाला कुठलीही अडचण आली तर त्याचे निरसन ह्या चॅनेलवर होईल . त्यामुळे नक्की जॉईन करा मी वाट बघतीये।.... आपल्या चॅनेल च्या रेसिपी नक्की बघा आणि तुम्हाला आवडल्या तर 'Cook with Teja ' ह्या चॅनेल ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ... अजूनही कोणत्या नव्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा रिप्लाय नक्की द्या. वाट बघतीये हं... Happy cooking... अन्नपूर्णा सुखी भव!!!... व्हेज थाई सूप : Tom kha Gai थायलँड ...एक नितांत सुंदर देश! भारताच्या जवळ असलेला , अतिशय संपन्न निसर्ग आणि खाद्यसंस्कृती असणारा देश!! आज आपण बघणार आहोत व्हेज थाई सूप किंवा 'Tom kha gai'! लागणारे साहित्य : गवतीचहा चहा :4 ते 5 पाने. लिंबाची पाने: पाच ते सहा. आलं/गलंगल अर्धा इंच . मॅगी व्हेज.स्टॉक क्यूब:1 बटर :अर्धा चमचा चिरलेल्या भाज्या: गाजर 1 , लाल हिरवी यलो कॅप्सीकम झुकीनी :अर्धी फ्लॉवर/ब्रोकोली :अर्धी वाटी। कोकोनट मिल्क पावडर किंवा नारळाचे दूध: एक वाटी दूध :1 ग्लास कॉर्नफ्लॉवर: एक चमचा साखर: एक चमचा मीठ अर्धा चमचा बारीक चिरलेली लाल मिरची :एक मिरे पूड प्रथम एका भांड्यात दिड ग्लास पाणी आणि चिरलेला गवतीचहा, लिंबाची पाने आणि आलं ठेचून घालून चांगली उकळी येऊ द्यावी। पाण्यात या सगळ्यांचा अर्क उतरे पर्यंत उकळून घ्यावे। नंतर पातेल्यातले पाणी ओतून घेऊन त्याच पातेल्यात बटर घालून सगळ्या भाज्या मंद गॅसवर थोड्या परतून घ्याव्यात । मग त्या भाज्या बाहेर काढून परत पाणी घालून उकळी आणावी। गॅस मंद असताना कोकोनट पावडर मध्ये कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यावी व उकळत्या पाण्यात हळूहळू घालून चांगले एकजीव करावे। वरून मिरपूड साखर मीठ घालून परतलेल्या भाज्या घालून,उकळी आल्यावर गरम गरम सूप सर्व्ह करावे।

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1